राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपहार्य विधान केले होते. याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवाय राष्ट्रवादीकडून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.